वाहनधारकांनो, जागे व्हा! 2019 पूर्वीच्या गाड्यांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य heydinu57@gmail.com, February 13, 2025February 13, 2025 राज्यातील वाहन धारकांसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. जर तुमच्या वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) नसल्यास, 1 एप्रिलपासून तुमच्यावर कारवाई होऊ शकते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नव्या आदेशानुसार, 2019 पूर्वीच्या गाड्यांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुमचं वाहन 2019 पूर्वीचं असेल, तर 31 मार्चपर्यंत तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लाववून घ्यावी लागेल, अन्यथा ₹1000 पर्यंतचा भूरदंड आकारला जाईल. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय? हे नंबर प्लेट वाहन धारकांच्या सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. वाहतूक प्रशासनानुसार, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या मदतीने वाहन धारकांची ओळख आणि त्यांच्या वाहनाचा मागोवा घेतला जाऊ शकतो, ज्यामुळे सुरक्षा वाढेल. शुल्क किती आहे? HSRP साठीच्या शुल्काची माहिती अशी: दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी ₹450 तीन चाकी वाहनांसाठी ₹500 इतर सर्व वाहनांसाठी ₹745 + जीएसटी वाहनधारकांना हे शुल्क महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइट maharashtrahsrp.com वर जाऊन भरावे लागेल. नंबर प्लेट लावण्यासाठी अडचणी जरी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक केली गेली आहे, तरी वाहन धारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. प्रमुख शहरांमध्ये जसे की मुंबई, नाशिक आणि पुण्यात नंबर प्लेट लावण्यासाठी खाजगी एजन्सींना कंत्राट देण्यात आलं आहे. मात्र, अनेक वाहनधारकांनी सांगितलं की वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करताना अनेक अडचणी येत आहेत. कधी लिंक ओपन होत नाही, तर कधी नंबर प्लेट मिळण्याची शाश्वती नाही. 90 दिवसांच्या आत नंबर प्लेट मिळण्याची गॅरंटी नसल्यामुळे वाहनधारकांची चिंता वाढली आहे. डुप्लिकेट नंबर प्लेटचा सुळसुळाट मात्र, या संदर्भात बाजारात डुप्लिकेट नंबर प्लेटचा सुळसुळाट दिसून येत आहे. अनेक एजंट अधिक पैसे घेऊन लवकर नंबर प्लेट मिळवून देण्याचं आश्वासन देत आहेत. यामुळे सरकारला चिंता आहे आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची महत्त्वता वाढली आहे. अपघात आणि सुरक्षा फॅन्सी नंबर प्लेट आणि विचित्र पद्धतीने लावलेली नंबर प्लेट अनेक वेळा सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये आणि स्पीड रडारमध्ये रीड होत नाहीत. यामुळे अपघातांच्या वेळेस वाहनधारकांची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येतात. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या माध्यमातून वाहन चालवताना शिस्त लागेल का, आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 31 मार्चची डेडलाईन लक्षात ठेवून वाहन धारकांनी लवकरात लवकर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घ्यावी, अन्यथा कारवाई होऊ शकते. Letest News